गणना ३१:१-३
१
मग याहवेह मोशेला म्हणाले,
२
“इस्राएली लोकांसाठी मिद्यानी लोकांचा सूड घे. त्यानंतर तू तुझ्या लोकांत मिळविला जाशील.”
३
तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, “मिद्यानी लोकांशी युद्ध करावे म्हणून तुम्ही आपल्यातील काही पुरुषांना सिद्ध करा, म्हणजे ते याहवेहच्या वतीने त्यांचा सूड घेतील.