Skip to content
गणना २२:७-११

गणना २२:७-११

७
मोआबी व मिद्यानी वडील, शकुन पाहण्यासाठी मोबदला घेऊन निघाले. जेव्हा ते बलामाकडे आले, तेव्हा बालाक जे काही म्हणाला ते त्याला सांगितले.
८
बलाम त्यांना म्हणाला, “आज रात्री येथे मुक्काम करा आणि याहवेह मला जे काही सांगतील ते मी तुम्हाला कळवेन.” म्हणून मोआबी सरदार त्याच्याकडे राहिले.
९
परमेश्वराने बलामाकडे येऊन त्याला विचारले, “तुझ्याबरोबर हे पुरुष कोण आहेत?”
१०
बलाम परमेश्वराला म्हणाला, “सिप्पोरचा पुत्र बालाक, मोआबाच्या राजाने मला हा संदेश पाठवला आहे:
११
‘इजिप्तमधून काही लोक बाहेर आले आहेत; व त्यांनी पृथ्वी व्यापून टाकली आहे. तर आता ये आणि माझ्यासाठी त्यांना शाप दे. कदाचित मी त्यांचा पराभव करून त्यांना देशातून हाकलून देऊ शकेल.’ ”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options