Skip to content
गणना १५:३७-४१

गणना १५:३७-४१

३७
याहवेह मोशेला म्हणाले,
३८
“इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: येणार्‍या सर्व पिढ्यांपर्यंत तुम्ही आपल्या वस्त्राच्या काठांना गोंडे लावावे, प्रत्येक गोंड्यावर निळा दोरा असावा.
३९
ते यासाठी की तुम्ही त्यांच्याकडे पाहावे व याहवेहच्या सर्व आज्ञांचे तुम्हाला स्मरण व्हावे, म्हणजे तुम्ही त्यांचे पालन करावे आणि आपल्या अंतःकरणाच्या व डोळ्यांच्या वासनांच्या मागे लागून व्यभिचार करू नये.
४०
मग तुम्हाला माझ्या सर्व आज्ञांचे पालन करण्याची आठवण राहील आणि तुम्ही तुमच्या परमेश्वरासाठी पवित्र राहाल.
४१
तुमचा परमेश्वर व्हावे म्हणून ज्याने तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले तो मीच याहवेह आहे. मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options