Skip to content
गणना १५:२७-३१

गणना १५:२७-३१

२७
“ ‘परंतु जर केवळ एकाच व्यक्तीने नकळत पाप केले असेल, तर त्या व्यक्तीने पापार्पणासाठी एक वर्षाची शेळी आणावी.
२८
ज्या व्यक्तीने नकळत पाप केले आहे त्या व्यक्तीसाठी याजकाने याहवेहसमोर प्रायश्चित्त करावे आणि जेव्हा प्रायश्चित केले जाईल, तेव्हा त्या व्यक्तीला क्षमा करण्यात येईल.
२९
जे कोणी नकळत पाप करतील त्यांच्यासाठी हाच एक नियम लागू असावा, ती व्यक्ती जन्मतः इस्राएली असो किंवा तुमच्यामध्ये राहणारा परदेशी असो.
३०
“ ‘परंतु जे कोणीही मुद्दाम पाप करतात, ते स्वदेशी असो किंवा परदेशी, ते याहवेहविषयी दुर्भाषण करतात, त्यांचे इस्राएली लोकांतून उच्छेदन करावे.
३१
कारण त्यांनी याहवेहच्या शब्दाला तुच्छ मानले आहे आणि याहवेहच्या आज्ञा मोडल्या आहेत, त्यांचे खचितच उच्छेदन करावे; त्यांचा दोष त्यांच्यावर राहील.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options