Skip to content
गणना १५:२२-२८

गणना १५:२२-२८

२२
“ ‘आता जर तुम्ही एक समुदाय म्हणून याहवेहने मोशेला दिलेल्या या आज्ञांपैकी कोणतीही आज्ञा पाळण्यास नकळतपणे अपयशी ठरला—
२३
ज्या आज्ञा याहवेहने मोशेद्वारे तुम्हाला दिलेल्या आहेत, ज्या दिवशी त्या दिल्या तेव्हापासून भविष्यातही येणार्‍या पिढ्यांसाठी त्या असतील—
२४
आणि जर समुदाय जागृत नसताना हे नकळत घडले असेल, तर संपूर्ण समुदायाने एका तरुण गोर्‍ह्याचे याहवेहला सुवासिक होमार्पण करावे आणि त्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण आणि पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
२५
याजकाने सर्व इस्राएली समुदायासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल; कारण त्यांनी मुद्दाम पाप केले नव्हते आणि त्यांनी याहवेहला आपल्या पापाबद्दल अन्नार्पण व पापार्पण सादर केले आहेत.
२६
सर्व इस्राएली समुदाय व त्यामध्ये राहणारे परदेश्यांची क्षमा केली जाईल, कारण सर्वांनी जे पाप केले ते नकळत झाले होते.
२७
“ ‘परंतु जर केवळ एकाच व्यक्तीने नकळत पाप केले असेल, तर त्या व्यक्तीने पापार्पणासाठी एक वर्षाची शेळी आणावी.
२८
ज्या व्यक्तीने नकळत पाप केले आहे त्या व्यक्तीसाठी याजकाने याहवेहसमोर प्रायश्चित्त करावे आणि जेव्हा प्रायश्चित केले जाईल, तेव्हा त्या व्यक्तीला क्षमा करण्यात येईल.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options