गणना १४:२८-३५
२८
म्हणून त्यांना सांगा, याहवेह म्हणतात, खचितच मी जिवंत आहे, जे काही तुम्ही बोलला आहात तेच मी तुम्हास करेन:
२९
याच रानात तुम्ही सर्व मरण पावाल—तुमच्यापैकी प्रत्येक जे वीस वर्षे व त्याहून अधिक वयाचे आहेत, ज्यांची जनगणनेमध्ये गणती झाली आणि ज्यांनी माझ्याविरुद्ध कुरकुर केली.
३०
ज्या देशाविषयी मी हात उंच करून म्हटले की त्यात मी तुम्हाला वसवेन, त्या देशात तुमच्यापैकी यफुन्नेहचा पुत्र कालेब आणि नूनाचा पुत्र यहोशुआ यांच्याशिवाय कोणीही जाणार नाही.
३१
ज्या तुमच्या लेकरांविषयी तुम्ही म्हणाला होता की, त्या देशात ते लूट असे होतील, त्यात मी त्यांना आणेन, अशासाठी की ज्या देशाचा तुम्ही धिक्कार केला त्याचा त्यांनी आनंद भोगावा.
३२
परंतु तुमच्याविषयी तर असे की, तुमचे देह याच रानात पडतील.
३३
तुमच्यापैकी अगदी शेवटचा देह या रानात पडेपर्यंत तुमची लेकरे तुमच्या अविश्वासूपणाचे परिणाम भोगत चाळीस वर्षे मेंढपाळ म्हणून राहतील.
३४
चाळीस दिवस तुम्ही देश हेरला त्याप्रमाणे प्रत्येक दिवसाला एक वर्ष अशी चाळीस वर्षे तुम्ही आपल्या पापाचे परिणाम भोगाल आणि माझ्या विरोधात जाणे कसे असते हे तुम्ही जाणाल.
३५
मी याहवेह हे बोललो आहे आणि जे माझ्या विरोधात एकत्र आले आहेत त्या संपूर्ण दुष्ट समाजाला मी असे निश्चितच करेन. त्यांचा शेवट ते या रानातच पाहतील; ते येथेच मरण पावतील.”
Settings