Skip to content
गणना ११:१६-२३

देव सत्तर वडील नेमतो

गणना ११:१६-२३
१६
याहवेह मोशेला म्हणाले: “इस्राएली लोकांमधील सत्तर वडील ज्यांना तू पुढारी आणि अधिकारी म्हणून ओळखतो, त्यांना माझ्यासमोर आण. त्यांनी सभामंडपात यावे व तुझ्याबरोबर उभे राहावे.
१७
मी खाली येऊन तिथे तुझ्याशी बोलेन आणि जो आत्मा तुझ्यावर आहे, त्याचे काही सामर्थ्य मी घेऊन त्यांच्यावर ठेवेन. ते तुझ्याबरोबर लोकांचा भार वाहतील म्हणजे तुला एकट्याला तो वाहावा लागणार नाही.
१८
“लोकांना सांग: ‘उद्याच्या तयारीकरिता स्वतःला पवित्र करा, कारण उद्या त्यांना मांस खायला मिळेल. “आम्हाला मांस खायला मिळाले तर किती बरे! आम्ही इजिप्तमध्ये चांगले होतो!” हे तुमचे रडणे याहवेहने ऐकले आहे, आता याहवेह तुम्हाला मांस देणार आहेत आणि ते तुम्ही खाल.
१९
तुम्ही ते केवळ एक दिवस किंवा दोन दिवस, किंवा पाच दिवस, दहा, किंवा वीस दिवस,
२०
परंतु संपूर्ण एक महिना; ते तुमच्या नाकपुड्यातून बाहेर येईपर्यंत आणि ते तुम्हाला नकोसे वाटेपर्यंत ते तुम्ही खाल; कारण तुम्ही याहवेह जे तुमच्यामध्ये राहतात त्यांना नाकारले आहे, त्यांच्यासमोर रडत म्हणाला, “आम्ही इजिप्त का सोडले?” ’ ”
२१
पण मोशे म्हणाला, “इथे ज्या लोकांमध्ये मी आहे ते सहा लाख पुरुष पायदळ आहेत आणि तुम्ही म्हणता, ‘मी त्यांना एक महिनाभर मांस खायला देणार!’
२२
गुरे व शेरडेमेंढरे कापली तरी ते त्यांच्यासाठी पुरेसे होईल काय? समुद्रातील सर्व मासे पकडले तरी ते त्यांना पुरतील काय?”
२३
याहवेहने मोशेला उत्तर दिले, “याहवेहचा हात इतका आखूड आहे काय? माझे शब्द घडून येतात की नाही हे तू आता पाहशील.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options