गणना १०:११-१६
११
दुसर्या वर्षाच्या दुसर्या महिन्याच्या विसाव्या दिवशी कराराच्या नियमाच्या निवासमंडपावरून मेघ वरती घेतला गेला.
१२
तेव्हा इस्राएली लोक सीनायच्या रानातून निघाले आणि पारानाच्या रानात मेघ स्थिर होईपर्यंत एका ठिकाणातून दुसर्या ठिकाणी प्रवास करीत राहिले.
१३
याहवेहने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेनुसार ते पहिल्या प्रवासास निघाले.
१४
यहूदाह वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली प्रथम निघाला. अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन त्यांचा सेनापती होता.
१५
सूवाराचा पुत्र नथानेल हा इस्साखार वंशाच्या दलावर होता,
१६
आणि हेलोनाचा पुत्र एलियाब जबुलून वंशाच्या दलावर होता.
Settings