नहेम्याह ६:१-६
१
सनबल्लट, तोबीयाह, गेशेम अरबी आणि आमच्या इतर शत्रूंना समजले की मी तट बांधण्याचे काम अंदाजे पूर्ण केले आहे व एकही भेग बाकी राहिली नाही—खरेतर वेशींना दरवाजे लावण्याचेच काम राहिलेले होते,
२
तेव्हा सनबल्लट व गेशेम यांनी मला असा निरोप पाठविला, “ये, आपण ओनोच्या मैदानातील एका खेडेगावात भेटू या.” पण ते मला दुखापत करण्याचा कट करीत असल्याचे मला समजले,
३
म्हणून मी त्यांच्याकडे उलट हा निरोप पाठविला: “मी एक महान कार्य करीत आहे; ते कार्य थांबवून मी तुमच्या भेटीला का यावे?”
४
त्यांनी चार वेळा मला तो निरोप पाठविला आणि प्रत्येक वेळी मी तेच उत्तर दिले.
५
पाचव्या वेळेला सनबल्लटाचा सेवक हातात तोच निरोप असलेले एक खुले पत्र घेऊन आला.
६
त्या पत्रात असा मजकूर होता: “देशादेशात असे ऐकिवात येत आहे की—गेशेमचे म्हणणे आहे की हे सत्य आहे की, यहूदी लोक बंड करण्याची योजना आखीत आहेत आणि त्यासाठीच तू हा तट बांधत आहेस. असेही म्हटले जाते की तू त्यांचा राजा बनणार आहेस,
Settings