नहेम्याह ५:९-१३
९
मग मी पुढे म्हणालो, “तुम्ही जे करीत आहात, ते अयोग्य आहे. आपल्या सभोवतालच्या राष्ट्रांमध्ये आपली निंदा होऊ नये म्हणून तुम्ही परमेश्वराचे भय बाळगू नये काय?
१०
मी व माझे बंधू, आणि माझे लोक कोणतेही व्याज न घेता पैसे आणि धान्य उसने देत आहोत. आपण हे व्याज घेणे बंद केले पाहिजे!
११
त्यांची शेते, द्राक्षमळे, जैतुनाचे मळे आणि घरे त्यांना लगेच परत करा व पैसे, धान्य, नवा द्राक्षारस व जैतुनाचे तेल यावरील एक टक्का जे व्याज म्हणून तुम्ही त्यांच्याकडून घेता ते सोडून द्या.”
१२
त्यांनी म्हटले, “आम्ही त्यांना सर्वकाही परत देऊ. आणि त्यांच्याकडून काहीही मागणी करणार नाही. तुम्ही म्हणता तसेच आम्ही करू.” मग मी याजकांना बोलाविणे पाठविले, प्रतिष्ठित व इतर अधिकाऱ्यांकडून त्यांनी जे वचन दिले होते, त्या शपथा घेण्यास लावल्या.
१३
व माझ्या अंगरख्याची दुमड धरून तो झटकून म्हटले, “जो कोणी या शपथेचे पालन करणार नाही, परमेश्वर त्याची घरे व त्याची संपत्ती असेच झटकून टाकेल. तर असा मनुष्य असाच झटकला जाऊन पूर्णपणे रिकामा होवो!” यावर सभेतील सर्व लोक म्हणाले, “आमेन” आणि त्यांनी याहवेहची स्तुती केली. सर्व लोकांनी आपल्या वचनाप्रमाणे केले.
Settings