Skip to content
नहेम्याह ३:१५-१६

नहेम्याह ३:१५-१६

१५
कोल-होजेचा पुत्र शल्लूम मिस्पाह जिल्ह्याचा अधिकारी होता. त्याने झरा वेशीची दुरुस्ती करून ती परत बांधली, तिच्यावर छत टाकले व दरवाजे उभे करून त्यांना अडसर व गज लावले. नंतर शेलाह तळ्यापासून राजाच्या बागेपर्यंतच्या, यरुशलेमच्या दावीदाच्या नगराच्या उतारावरील पायर्‍यापर्यंतच्या कोटाची त्याने दुरुस्ती केली.
१६
त्याच्या पलीकडे अजबुकाचा पुत्र नहेम्याह होता. तो बेथ-सूर जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी होता. त्याने दावीद राजाच्या कबरस्तानापर्यंत, कृत्रिम तळ्यापर्यंत आणि वीरांचे गृह या ठिकाणापर्यंत दुरुस्ती केली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options