नहेम्याह १२:४५
आजूबाजूच्या संदर्भासह वचन ४५ दाखवत आहे.
४२
व मासेयाह, शमायाह, एलअज़ार, उज्जी, यहोहानान, मल्कीयाह, एलाम व एजेर यांनीही यझ्रहयाहच्या मार्गदर्शनाखाली गायकवृंदाने गाईले.
४३
या आनंदाच्या दिवशी अनेक मोठमोठी अर्पणे करण्यात आणली, कारण परमेश्वराने त्यांना फार मोठा हर्ष दिला होता. स्त्रिया व मुलांनी देखील आनंद व्यक्त केला. यरुशलेममधील लोकांच्या आनंदाचे निनाद दूरवर ऐकू आले.
४४
त्यावेळी प्रथम हंगामाची अर्पणे व दशांश या अर्पणांच्या भांडारावर पुरुष अधिकारी नेमण्यात आले. ही सर्व अर्पणे मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे सभोवतीच्या नगरींच्या शेतांप्रमाणे अर्पणे याजक व लेवींना नेमून देण्यात आली, त्यांनी ती गोळा करून भांडारात जमा करावयाची होती. कारण यहूदीयाच्या लोकांना लेवी व याजक आणि त्यांचे सेवाकार्य यांचे कौतुक वाटत होते.
४५
दावीद आणि त्याचा पुत्र शलोमोनाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे परमेश्वराच्या उपासनेत आणि शुद्धीकरणविधीमध्ये गायक व द्वारपाल हे सहकार्य करीत होते.
४६
दावीदाच्या व आसाफाच्या काळापासून संगीतकारांसाठी संचालक नेमण्याची व परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे व उपकारस्तुती गाण्यास सुरुवात झाली होती.
४७
म्हणून सर्व इस्राएली जरूब्बाबेल आणि नहेम्याहच्या काळात द्वारपाल, लेवी व संगीतकारांसाठी दररोज अन्नाचा वाटा आणत असत. ते आपल्याला मिळालेल्या हिश्शातील काही भाग इतर लेव्यांसाठी ठेवीत आणि लेवी आपल्यातील वाटा अहरोनाच्या वंशजांसाठी समर्पित करीत असत.
Settings