Skip to content
नहेम्याह १२:३१-३७

नहेम्याह १२:३१-३७

३१
मी यहूदाह पुढार्‍यांना तटावर नेले. धन्यवाद देण्याकरिता त्यांचे दोन मोठे गायकवृंद तयार केले. स्तुतिस्तोत्रे गात त्या रांगा एकमेकींच्या विरुद्ध दिशेने चालल्या. एक गायकवृंद तटाच्या वर उजवीकडे म्हणजे उकिरडा वेशीकडे चालली.
३२
होशयाह व यहूदाहच्या पुढार्‍यांपैकी अर्धे त्यांच्या मागोमाग चालले.
३३
अजर्‍याह सोबत, एज्रा, मशुल्लाम,
३४
यहूदाह, बिन्यामीन, शमायाह व यिर्मयाह यांचा त्यात समावेश होता.
३५
तसेच काही याजकांनी कर्णे वाजविले आणि जखर्‍याह, योनाथानाचा पुत्र, तो शमायाहचा पुत्र, तो मत्तन्याहचा पुत्र, तो मिखायाहचा पुत्र, तो जक्कूराचा पुत्र, तो आसाफाचा पुत्र होता,
३६
त्याचे सहकारी—शमायाह, अजरएल, मिललई, गिललई, माई, नथानेल, यहूदाह व हनानी—यांनी परमेश्वराचा मनुष्य दावीदाने नेमून दिलेली वाद्ये वापरली. एज्रा शास्त्राचा शिक्षक त्यांच्या अग्रभागी चालला होता.
३७
ते झरावेशीजवळ आले, तेव्हा ते सरळ पुढे गेले व दावीदाच्या नगराच्या पायर्‍यांवरून तटाच्या चढणीवर असलेल्या दावीदाच्या महालाच्या वरच्या भागाकडून पूर्वेकडे पाणीवेशीपर्यंत गेले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options