Skip to content
मत्तय ८:२३

मत्तय ८:२३

आजूबाजूच्या संदर्भासह वचन २३ दाखवत आहे.
२०
येशूंनी उत्तर दिले, “कोल्ह्यांना बिळे आणि आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत, परंतु मानवपुत्राला डोके टेकण्यासही जागा नाही.”
२१
त्यांच्या शिष्यांपैकी दुसर्‍या एकाने म्हटले, “प्रभूजी, प्रथम मला माझ्या वडिलांना पुरावयास जाऊ द्या.”
२२
येशूंनी त्याला म्हटले, “मला अनुसर आणि जे मेलेले आहेत, त्यांना आपल्या मृतांना मूठमाती देऊ दे.”
२३
मग त्यांचे शिष्य होडीत बसून त्यांच्याबरोबर गेले.
२४
तेव्हा, एकाएकी सरोवरात भयंकर वादळ सुटले, लाटा होडीवर आदळू लागल्या व त्यांची होडी बुडू लागली. पण येशू झोपी गेले होते.
२५
तेव्हा शिष्यांनी त्यांना उठविले आणि ते त्यांना म्हणाले, “प्रभूजी, आम्हाला वाचवा! आपण सर्वजण बुडत आहोत!”
२६
येशू त्यांना म्हणाले, “अहो, अल्पविश्वासी, तुम्ही इतके का घाबरला?” मग ते उठले आणि त्यांनी वार्‍याला व लाटांना धमकाविले आणि सर्वकाही शांत झाले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options