मत्तय २७:२२-२४
२२
“मग ख्रिस्त जो येशू यांचे मी काय करावे?” पिलाताने विचारले. “त्याला क्रूसावर खिळा,” लोक मोठ्याने ओरडले.
२३
“पण का?” पिलाताने खुलासा विचारला, “त्याने असा कोणता गुन्हा केला आहे?” पण लोकांनी अधिकच मोठ्याने गर्जना केली, “त्याला क्रूसावर खिळा!”
२४
पिलाताला समजले की आपण काहीही करू शकत नाही, दंगल वाढत आहे असे त्याने पाहिले, तेव्हा त्याने पाणी घेतले आणि सर्व जमावापुढे आपले हात धुतले. “मी या माणसाच्या रक्ताबाबत निर्दोष आहे.” तो म्हणाला, “ही तुमची जबाबदारी आहे.”
Settings