Skip to content
मत्तय २५:१४-१७

मत्तय २५:१४-१७

१४
“पुन्हा, ते प्रवासाला निघालेल्या एका मनुष्यासारखे आहे. त्याने त्याच्या दासांना एकत्र बोलाविले आणि प्रत्येकाला त्याने ठराविक रक्कम दिली.
१५
त्याने एकाला सोन्याचे पाच तालांत, दुसर्‍याला दोन आणि तिसर्‍याला एक, असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि मग तो आपल्या प्रवासाला निघून गेला.
१६
नंतर, ज्या सेवकाला पाच सोन्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्याने ताबडतोब कामधंदा सुरू केला आणि लवकरच त्याने पाच थैल्या अधिक मिळविल्या.
१७
त्याचप्रमाणे ज्याला दोन सोन्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्यानेही आणखी दोन थैल्या मिळविल्या.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options