Skip to content
मार्क १२:३२-३८

मार्क १२:३२-३८

३२
“योग्य बोललात, गुरुजी” त्या मनुष्याने उत्तर दिले, “परमेश्वर ‘एकच आहेत आणि त्यांच्याशिवाय दुसरे परमेश्वर नाहीत’ हे आपण बरोबर सांगितले आहे.
३३
त्यांच्यावर पूर्ण अंतःकरणाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करणे, हे सर्व प्रकारची होमार्पणे व बली वाहण्यापेक्षा फारच महत्त्वाचे आहे.”
३४
त्याने सुज्ञतेने उत्तर दिले आहे हे पाहून येशू त्याला म्हणाले, “तू परमेश्वराच्या राज्यापासून दूर नाहीस.” आणि तेव्हापासून कोणी त्यांना आणखी प्रश्न विचारावयास धजले नाहीत.
३५
नंतर मंदिराच्या आवारात लोकांना शिक्षण देतांना, येशूंनी त्यांना विचारले, “ख्रिस्त, हा दावीदाचा पुत्र आहे, असे तुमचे नियमशास्त्र शिक्षक का म्हणतात?”
३६
कारण दावीद स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हणतो, “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले, “मी तुझ्या शत्रूंना, तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत, तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’
३७
स्वतः दावीद त्यांना ‘प्रभू’ असे म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असू शकेल?” जमलेला मोठा जमाव येशूंचे भाषण मोठ्या आनंदाने ऐकत होता.
३८
येशू शिकवीत होते, ते म्हणाले, “या नियमशास्त्राच्या शिक्षकांबाबत खबरदारी बाळगा! त्यांना लांब झगे घालून बाजारात लोकांकडून आदरपूर्वक अभिवादन घेणे,
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options