Skip to content
मार्क १०:४५

मार्क १०:४५

आजूबाजूच्या संदर्भासह वचन ४५ दाखवत आहे.
४२
येशूंनी त्यांना एकत्र बोलावून म्हटले, “गैरयहूदीयांवर शासन करणारे त्यांच्यावर हुकमत चालवितात आणि त्यांचे उच्चाधिकारी त्यांच्यावर अधिकार गाजविणारे हे तुम्हाला माहीत आहे.
४३
पण तुम्हामध्ये तसे नसावे. तुमच्यामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो, त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे.
४४
आणि जो कोणी प्रथम होऊ पाहतो, तो सर्वांचा गुलाम झाला पाहिजे.
४५
मी मानवपुत्र, सेवा करवून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास आणि पुष्कळांच्या उद्धारासाठी आपला जीव खंडणी म्हणून द्यावयास आलो आहे.”
४६
मग येशू यरीहो शहरात आले. तिथे येशू आणि त्यांचे शिष्य, मोठ्या समुदायासह शहर सोडून जात असताना, तीमयाचा पुत्र बार्तीमय हा आंधळा, येशू ज्या रस्त्याने चालले होते, त्या रस्त्याच्या कडेला भीक मागत बसला होता.
४७
जेव्हा हे नासरेथकर येशू जात आहेत असे त्याने ऐकले, तेव्हा तो मोठ्याने ओरडू लागला, “अहो येशू, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा!”
४८
अनेकांनी त्याला धमकाविले आणि गप्प बसण्यास सांगितले, पण तो अधिकच मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागला, “अहो, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा!”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options