मार्क १०:३२-३३
३२
ते आता यरुशलेमच्या वाटेला लागले असताना, येशू पुढे चालले होते, शिष्य आश्चर्यचकित झाले होते, तर त्यांच्यामागे चालणारे जे इतर लोक होते, ते भयभीत झाले होते. पुन्हा एकदा येशूंनी आपल्या बारा शिष्यांना एका बाजूला नेले आणि त्यांच्या बाबतीत काय घडणार हे त्यांना सांगू लागले.
३३
“आपण यरुशलेमात जात आहोत” ते म्हणाले, “तिथे मानवपुत्राला प्रमुख याजक व नियमशास्त्र शिक्षक यांच्या हवाली करण्यात येईल. ते त्याच्यावर आरोप करून त्याला मृत्युदंड देतील आणि गैरयहूदी लोकांच्या स्वाधीन करतील.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings