Skip to content
लूक ७:१२-१५

लूक ७:१२-१५

१२
ते गावाच्या वेशीजवळ आले असता एका मुलाची प्रेतयात्रा बाहेर पडत होती व तो आपल्या विधवा आईचा एकुलता एक पुत्र होता. तिच्याबरोबर गावातील मोठा लोकसमूह होता.
१३
प्रभूने तिला पाहिले, तेव्हा त्यांचे हृदय कळवळले आणि ते तिला म्हणाले, “रडू नकोस.”
१४
नंतर पुढे जाऊन ज्या तिरडीवर त्याला ठेवले होते त्याला स्पर्श केला, तेव्हा तिरडी वाहणारे थांबले. येशूंनी म्हटले, “तरुणा, मी तुला सांगतो, ऊठ!”
१५
तेव्हा तो मृत मुलगा उठून बसला आणि बोलू लागला. मग येशूंनी त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options