Skip to content
लूक १३:१८-२२

राज्याच्या वाढीचे दाखले

लूक १३:१८-२२
१८
नंतर येशूंनी विचारले, “परमेश्वराचे राज्य कशाप्रकारचे आहे? त्याची तुलना मी कशाशी करू?
१९
एका मनुष्याने आपल्या बागेत पेरलेल्या मोहरीच्या दाण्यासारखे आहे. ते वाढून मोठे झाड होते आणि त्याच्या फांद्यांमध्ये आकाशातील पक्षी विसावा घेतात.”
२०
पुन्हा येशूंनी विचारले, “परमेश्वराच्या राज्याची तुलना मी कशाबरोबर करू?
२१
ते खमिरासारखे आहे, एका स्त्रीने ते घेतले आणि तीन माप पिठात तोपर्यंत एकत्र केले की त्यामुळे सर्व पीठ चांगले फुगले.”
२२
नंतर येशू शहरातून आणि गावातून शिक्षण देत यरुशलेमकडे जाण्यासाठी निघाले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options