लूक १०:२७-३०
२७
त्याने उत्तर दिले, “ ‘प्रभू तुमचा परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण अंतःकरणाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने’ आणि ‘तुमच्या पूर्णशक्तीने आणि तुमच्या पूर्ण मनाने प्रीती करा आणि जशी स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा.’”
२८
“अगदी बरोबर सांगितलेस,” येशू म्हणाले, “तसेच कर म्हणजे तू जगशील.”
२९
तरी आपले न्यायीपणाचे समर्थन करण्यासाठी त्याने येशूंना विचारले, “माझा शेजारी कोण?”
३०
उत्तर देत येशू म्हणाले: “एक मनुष्य खाली यरुशलेमाहून यरीहोला जात असताना, चोरांनी त्याच्यावर हल्ला केला, कपडे हिसकावून घेतले, मारहाण केली आणि त्याला अर्धमेल्या अवस्थेत टाकून ते निघून गेले.
Settings