लूक १:७
आजूबाजूच्या संदर्भासह वचन ७ दाखवत आहे.
४
यासाठी की, ज्यागोष्टी तुम्हाला शिकविण्यात आल्या आहेत, त्यांची तुम्हाला खात्री होईल.
५
यहूदीयाचा राजा हेरोद याच्या काळात तिथे जखर्याह नावाचा एक याजक होता, तो अबीयाच्या याजकवर्गातील होता; त्याची पत्नी अलीशिबासुद्धा अहरोनाच्या वंशाची होती.
६
दोघेही परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान असून प्रभूच्या आज्ञा व नियम पालन करण्यामध्ये निर्दोष होते.
७
त्यांना मूलबाळ नव्हते, कारण अलीशिबा गर्भधारण करू शकत नव्हती आणि ती दोघेही खूप वयस्कर झालेली होती.
८
एकदा आपल्या गटाच्या अनुक्रमाने जखर्याह परमेश्वरापुढे याजक म्हणून सेवा करीत असताना,
९
परमेश्वराच्या मंदिरात जाऊन धूप जाळण्यासाठी याजकांच्या रीतीप्रमाणे चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली.
१०
आणि जेव्हा धूप जाळण्याची वेळ आली तेव्हा, जमलेले सर्व भक्तजन बाहेर प्रार्थना करीत होते.
Settings