Skip to content
लेवीय ८:२२-२९

लेवीय ८:२२-२९

२२
मग मोशेने दुसरा मेंढा, अर्थात् समर्पणाचा मेंढा घेतला व अहरोन व त्याच्या पुत्रांनी मेंढ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.
२३
मग मोशेने त्याचा वध केला व त्याचे काही रक्त घेऊन ते अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला व उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्यांना लावले.
२४
नंतर मोशेने काही रक्त अहरोनाच्या पुत्रांच्या उजव्या कानाच्या पाळ्यांना व उजव्या हाताच्या आणि उजव्या पायाच्या अंगठ्यांना लावले. उर्वरित सर्व रक्त त्याने वेदीभोवती शिंपडले.
२५
मग त्याने सर्व चरबी आणि चरबीदार शेपूट, आतड्यांवरील चरबी, चरबीसह दोन्ही गुरदे, काळजाची लांब पाळ व उजवी मांडी ही घेतली.
२६
आणि बेखमीर भाकरीची टोपली, जी याहवेहसमोर होती त्यातून त्याने एक जाड भाकर, जैतुनाच्या तेलात मळलेली एक जाड भाकर आणि एक पातळ भाकर घेतली, आणि त्याने ते सर्व चरबीच्या भागावर आणि उजव्या मांडीवर ठेवले.
२७
त्याने हे सर्व अहरोन व त्याच्या पुत्रांच्या हातांवर ठेवले आणि त्यांनी ते याहवेहसमोर हेलावणीचे अर्पण घेऊन त्याची ओवाळणी केली.
२८
नंतर मोशेने ते सर्व त्यांच्या हातातून घेतले आणि ते वेदीवर होमार्पणासहित समर्पणाचे अर्पण म्हणून सादर केले, हा याहवेहला सुवास म्हणून अर्पिलेले अन्नार्पण होते.
२९
मग मोशेने मेंढ्याच्या उराचा भाग घेतला, हा समर्पणाच्या गोर्‍ह्याचा त्याचा स्वतःचा वाटा होता, तो त्याने ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसमोर ओवाळले. याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोशेने हे केले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options