Skip to content
लेवीय ४:१४-२०

लेवीय ४:१४-२०

१४
आणि त्यांनी केलेले पाप सर्वांना माहीत होईल, तेव्हा त्या समुदायाने पापार्पण म्हणून एक गोर्‍हा आणावा आणि सभामंडपासमोर अर्पण करावा.
१५
तिथे इस्राएली समुदायातील पुढार्‍यांनी याहवेहसमोर त्यांचे हात त्या गोर्‍ह्याच्या मस्तकावर ठेवावेत, व याहवेहसमोर त्या गोर्‍ह्याचा वध करावा.
१६
नंतर अभिषिक्त याजकाने त्या गोर्‍ह्याचे काही रक्त सभामंडपात घेऊन जावे.
१७
याजकाने त्याची बोटे त्यात बुडवून याहवेहसमोर पडद्यापुढे ते सात वेळा शिंपडावे.
१८
त्यातील काही रक्त घेऊन ते याहवेहपुढे सभामंडपातील वेदीच्या शिंगांना लावावे व राहिलेले सर्व रक्त सभामंडपाच्या प्रवेशद्वाराकडे असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
१९
त्याने त्यावरील सर्व चरबी काढावी आणि तिचे वेदीवर होम करावे.
२०
पापार्पणाच्या गोर्‍ह्यासंबंधीच्या विधीप्रमाणेच त्याने या गोर्‍ह्याचेही करावे. अशा प्रकारे याजकाने संपूर्ण समुदायासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options