Skip to content
लेवीय २५:८-१७

लेवीय २५:८-१७

“ ‘तुम्ही सात शब्बाथ वर्षे मोजावे; म्हणजेच सात वेळा सात वर्षे; म्हणजे सात शब्बाथ वर्षांचा काळ एकोणपन्नास वर्षे होईल.
मग सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणजे प्रायश्चित्ताच्या दिवशी तुम्ही सर्वत्र कर्णे फुंकावे. प्रायश्चित्ताच्या दिवशी संपूर्ण देशात तुम्ही मोठ्या आवाजाचे कर्णे दीर्घकाल वाजवावे.
१०
पन्नासावे वर्ष पवित्र मानावे आणि संपूर्ण देशातील सर्व लोकांना मुक्ततेची घोषणा करावी. तुमच्यासाठी हा महोत्सव असेल; तुमच्यातील प्रत्येकाने तुमच्या कौटुंबिक मालमत्तेकडे आणि तुमच्या स्वतःच्या कुळाकडे परत जावे.
११
पन्नासावे वर्ष हे योबेल वर्ष असेल; आपोआप उगविलेल्या पिकांची कापणी करू नये किंवा छाटणी न झालेल्या द्राक्षवेलीची द्राक्षे गोळा करू नये.
१२
कारण हे योबेल वर्ष असेल आणि हे तुमच्याकरिता पवित्र असेल; शेतात आपोआप उगविलेले पीक तुम्ही खावे.
१३
“ ‘या योबेल वर्षी तुम्ही सर्वांनी आपल्या स्वतःच्या वतनात परत जावे.
१४
“ ‘यासाठी की तुम्ही जेव्हा आपल्या लोकांना जमीन विकाल किंवा त्याच्याकडून विकत घ्याल, तेव्हा तुमच्याकडून अन्यायाचा व्यवहार होऊ नये.
१५
योबेल वर्षानंतरच्या वर्षांच्या संख्येच्या आधारावर तुम्ही तुमच्या लोकांकडून विकत घ्यावयाची आणि पीक कापणीसाठी किती वर्षे शिल्लक आहेत या आधारावर त्याची तुम्हाला विक्री करावयाची आहे.
१६
जर वर्षे अनेक असतील तर जमिनीची किंमत त्या मानाने जास्त असेल, परंतु ही वर्षे थोडी असल्यास तिची किंमत त्या मानाने कमी असेल; कारण खरोखर विक्री जमिनीची होत नाही, तर ती जमीन किती वेळा पिके देऊ शकेल यावर तिची किंमत अवलंबून राहील.
१७
एकमेकांचा गैरफायदा घेऊ नका, तर तुमच्या परमेश्वराचे भय बाळगा. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options