Skip to content
लेवीय २५:४८-५५

लेवीय २५:४८-५५

४८
तर त्याची विक्री झाल्यावरही त्याच्या घराण्यापैकी कोणालाहीः
४९
त्याचा चुलता, पुतण्या किंवा त्याच्या जवळचा कोणीही खंडणी भरून त्याला सोडवून घेऊ शकेल, त्याला स्वतःलाच पैसा मिळाला तर खंडणी भरून तो स्वतःची सुटका करून घेऊ शकेल.
५०
त्याने स्वतःला विकले त्या वर्षापासून योबेल वर्षापर्यंत जितकी वर्षे राहिली असतील तितकी मोजून याकाळात एका मजुराला जितकी मजुरी द्यावी लागेल तितका पैसा भरून त्याची सुटका करावी.
५१
जर त्याला पुष्कळ वर्षे लागत असतील, तर त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी दिलेल्या किमतीचा मोठा भाग त्यांच्यासाठी द्यावा.
५२
जर योबेल वर्षाला थोडीच वर्षे राहिली असतील तर त्यांनी हिशोब करावा आणि त्यांच्या सुटकेसाठी नियमाप्रमाणे किंमत द्यावी.
५३
तो दरवर्षी मजुराच्या हिशोबाप्रमाणे त्याच्याबरोबर वागणूक करेल आणि ज्यांच्याकडून सेवा करून घेतात त्यांना कठोर वागणूक देऊ नये.
५४
“ ‘योबेल वर्षापर्यंतही तो मुक्त झाला नसेल, तर तो व त्याची मुलेबाळे योबेल वर्षी मुक्त होतील,
५५
कारण इस्राएली लोक माझेच सेवक आहेत; मीच त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले; मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options