मुख्य मजकुरावर जा
लेवीय २४:१५-२३

लेवीय २४:१५-२३

१५
इस्राएली लोकांना सांग: ‘जो कोणी आपल्या परमेश्वराला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी;
१६
याहवेहच्या नावाची जो कोणी निंदा करेल त्याला निश्चित जिवे मारावे. संपूर्ण मंडळीने त्याच्यावर दगडमार करावा. परदेशीय असो किंवा देशात जन्मलेला, जेव्हा ते परमेश्वराच्या नावाची निंदा करतात त्यांना निश्चित जिवे मारावे.
१७
“ ‘जो कोणी एखाद्या मनुष्याचा जीव घेईल त्याला निश्चित जिवे मारावे.
१८
जो कोणी एखाद्या मनुष्याच्या प्राण्याची हत्या करतो, तर त्याने निश्चित त्याची परतफेड करावी—जीवनासाठी जीवन.
१९
जो कोणी आपल्या शेजार्‍याला दुखापत करतो, त्याला त्याच प्रकारे दुखापत केली पाहिजे:
२०
हाड मोडल्याबद्दल हाड मोडणे, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात. ज्याप्रमाणे त्याने एखाद्या व्यक्तीला दुखापत केली आहे, त्यालाही निश्चित तीच दुखापत झाली पाहिजे.
२१
जो कोणी प्राण्याची हत्या करतो, त्याने निश्चित त्याची परतफेड करावी, परंतु जो कोणी मनुष्याची हत्या करतो त्याला जिवे मारावे.
२२
परदेशीय किंवा देशात जन्मलेल्यासाठी सारखाच नियम असावा. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”
२३
मग मोशे इस्राएली लोकांसोबत बोलला आणि त्यांनी त्या निंदा करणार्‍याला छावणीबाहेर नेले आणि त्याच्यावर दगडमार केला. याहवेहने मोशेला आज्ञापिल्यानुसार इस्राएली लोकांनी केले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options