मुख्य मजकुरावर जा
लेवीय २२:२६-३०

अतिरिक्त बलिदानांचे नियम

लेवीय २२:२६-३०
२६
याहवेह मोशेला म्हणाले,
२७
“वासरू, कोकरू वा करडू जन्मले असताना ते सात दिवस त्याच्या आईजवळ राहू द्यावे; आठव्या दिवसापासून याहवेहला अन्नार्पण करण्यास योग्य ठरेल.
२८
गाई व तिचे वासरू किंवा मेंढी व तिचे करडू यांचा एकाच दिवशी वध करू नये.
२९
“ज्यावेळी तुम्ही याहवेहला उपकारस्तुतीच्या बलीचा यज्ञ करता तेव्हा अशा प्रकारे करावा की तो तुमच्यावतीने मान्य व्हावा.
३०
त्याच दिवशी ते खाऊन टाकावे; त्यातील काहीही सकाळपर्यंत ठेवू नये. मी याहवेह आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options