Skip to content
लेवीय २२:१०-१६

पवित्र अर्पणे कोण खाऊ शकतो?

लेवीय २२:१०-१६
१०
“ ‘याजकाच्या कुटुंबा बाहेरील इतर कोणीही, त्याच्याकडे आलेले पाहुणे किंवा त्याच्याकडे काम करणारे मजूर यांनी पवित्र अर्पणांतील कोणताही पदार्थ खाऊ नये.
११
पण याजकाने स्वतःच्या पैशाने गुलाम विकत घेतला असेल किंवा जर त्या गुलामांनी याजकाच्या घरात जन्म घेतला असेल, ते त्याचे अन्न खाऊ शकतील.
१२
जर याजकाच्या कन्येचा विवाह याजकासोबत झाला नसून, दुसर्‍यासोबत झाला असेल तर तिने पवित्र अर्पणांतील पदार्थ खाऊ नयेत.
१३
पण जर याजकाची मुलगी विधवा किंवा पतीने सोडलेली असून तिला पुत्र नसेल आणि ती तरुणपणी पुन्हा आपल्या पित्याच्या घरात येऊन राहत असेल, तर मात्र तिने आपल्या पित्याच्या घरातील अन्न खावे. तथापि, कोणत्याही अनधिकृत व्यक्तीने हे अन्न खाऊ नये.
१४
“ ‘एखाद्याने चुकून पवित्र अर्पणांतील काही पदार्थ खाल्ले, तर त्याने जितके पदार्थ खाल्ले असतील तितके सर्व आणि पाचव्या हिश्शाइतका पदार्थाचा भाग याजकाला द्यावा.
१५
इस्राएली लोकांनी याहवेहला अर्पिलेली पवित्र अर्पणे, याजकाने भ्रष्ट करू नयेत,
१६
ती पवित्र अर्पणे खाण्यास मनाई न केल्यास पापदंड भरण्याची शिक्षा त्यांच्यावर ते ओढवून घेतील; मी याहवेह आहे, जो त्यांना पवित्र करतो.’ ”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options