लेवीय १५:१-४
१
याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले,
२
इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: जेव्हा कोणाही माणसाच्या शरीरातून स्राव होत असेल, तर अशा प्रकारचा स्त्राव हा अशुद्ध आहे.
३
त्याचे शरीर सतत स्राव बाहेर टाकीत असले किंवा अडवून ठेवीत असले, तरी तो मनुष्य अशुद्ध आहे. या स्रावामुळे तो मनुष्य अशुद्ध होतो:
४
ज्या बिछान्यावर तो झोपेल आणि ज्या बैठकीवर तो बसेल ती अशुद्ध होईल.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings