Skip to content
लेवीय १४:३४

लेवीय १४:३४

आजूबाजूच्या संदर्भासह वचन ३४ दाखवत आहे.
३१
एक पक्ष्याचे पापार्पण म्हणून व दुसर्‍या पक्ष्याचे अन्नार्पणासह होमार्पण म्हणून अर्पणे करावी. अशाप्रकारे याजकाने शुद्ध होणार्‍या माणसासाठी याहवेहपुढे प्रायश्चित्त करावे.”
३२
हे नियम सर्वसाधारणपणे शुद्धीकरणासाठी लागणारे अर्पण आणण्याची ऐपत नसलेल्या कुष्ठरोग्यांसाठी आहेत.
३३
याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले,
३४
“जेव्हा तुम्ही कनान देशात प्रवेश कराल, जो मी तुम्हाला वतन म्हणून दिला आहे, आणि मी तेथील एखाद्या घराला कुष्ठरोगाचा चट्टा देईन,
३५
तेव्हा त्या घराच्या मालकाने याजकाकडे येऊन त्याला सांगावे, ‘आमच्या घरात चट्ट्यासारखे काहीतरी दिसत आहे.’
३६
याजकाने घरामध्ये जाऊन चिन्हाचे परीक्षण करण्यापूर्वी, त्याने घर रिकामे करण्याचा आदेश दिला पाहिजे, अन्यथा त्या घरातील सर्व वस्तू अशुद्ध होऊ शकतील. त्यानंतर याजकाने त्या घरात प्रवेश करून त्याची तपासणी करावी.
३७
त्याने घराच्या भिंतींची तपासणी करून त्यावरील चट्टा भिंतींपेक्षा खोलवर हिरवट किंवा लालसर आहे, असे याजकाला आढळले,
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options