Skip to content
लेवीय ११:४४-४७

पवित्रतेचे आवाहन

लेवीय ११:४४-४७

पवित्रतेचे आवाहन

४४
मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; म्हणून तुम्ही स्वतःस पवित्र ठेवावे. मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र राहावे. म्हणून तुम्ही जमिनीवर सरपटणार्‍या कोणत्याही प्राण्याला स्पर्श करून स्वतःस विटाळवून घेऊ नये.
४५
मी याहवेह आहे, ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले यासाठी की मी तुमचा परमेश्वर असावा; म्हणून पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे.
४६
“पशू, पक्षी, प्रत्येक जलचर आणि प्रत्येक प्राणी जे जमिनीवर सरपटणारे आहेत त्यांच्यासंबंधी हे नियम आहेत.
४७
शुद्ध व अशुद्ध प्राणी तुम्ही खावे वा खाऊ नये यामधील फरक दाखविण्यासाठी हे नियम आहेत.”

उताऱ्याचा अभ्यास

एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • निर्गम २०:२

    “ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून व दास्यातून बाहेर आणले, तो मीच याहवेह, तुमचा परमेश्वर आहे.
    वचन ४४ मधून
  • लेवीय ११:४४

    मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; म्हणून तुम्ही स्वतःस पवित्र ठेवावे. मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र राहावे. म्हणून तुम्ही जमिनीवर सरपटणार्‍या कोणत्याही प्राण्याला स्पर्श करून स्वतःस विटाळवून घेऊ नये.
    वचन ४५ मधून
  • 1 पेत्र १:१५

    परंतु ज्यांनी तुम्हाला पाचारण केले ते जसे पवित्र आहेत, तसेच तुम्हीही जे काही करता त्यांच्यामध्ये पवित्र असा.
    वचन ४४ मधून
  • 1 पेत्र १:१६

    कारण शास्त्रलेखात असे लिहिले आहे, “तुम्ही पवित्र असावे, कारण मी पवित्र आहे.”
    वचन ४४ मधून
  • लेवीय १९:२

    “सर्व इस्राएली लोकांस सांग: ‘तुम्ही पवित्र असावे, कारण मी, याहवेह तुमचा परमेश्वर, पवित्र आहे.
    वचन ४४ मधून
  • लेवीय २०:७

    “ ‘तुम्ही स्वतःस शुद्ध राखून पवित्र राहावे, कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
    वचन ४४ मधून
  • 1 थेस्सलनीकाकरांस ४:७

    कारण परमेश्वराने आपल्याला अपवित्रतेसाठी नव्हे, तर पवित्र जीवन जगण्यासाठी पाचारण केले आहे.
    वचन ४४ मधून
  • लेवीय २०:२६

    तुम्ही माझ्यासाठी पवित्र असावे, कारण मी याहवेह पवित्र आहे आणि तुम्ही माझे व्हावे म्हणून मी तुम्हाला इतर सर्व राष्ट्रांपासून वेगळे केले आहे.
    वचन ४४ मधून
  • 1 पेत्र २:९

    परंतु तुम्ही निवडलेले लोक, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, परमेश्वराचे विशेष धन आहात, यासाठी की ज्यांनी तुम्हाला अंधारातून काढून त्यांच्या अद्भुत प्रकाशात आणले त्यांच्या स्तुतीची घोषणा करावी.
    वचन ४४ मधून
  • निर्गम ६:७

    मी तुम्हाला माझे लोक म्हणून स्वीकारेन आणि मी तुमचा परमेश्वर होईन, मग तुम्हाला कळून येईल की, तुम्हाला इजिप्तच्या ओझ्याखालून सोडविणारा परमेश्वर याहवेह मीच आहे.
    वचन ४४ मधून
  • लेवीय २१:८

    त्यांना पवित्र मानावे, कारण ते तुमच्या परमेश्वराला अन्न अर्पण करतात. त्यांना पवित्र समजावे, कारण मी याहवेह पवित्र आहे—मीच आहे जो तुम्हाला पवित्र करतो.
    वचन ४४ मधून
  • अनुवाद १४:२

    कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे पवित्रजन आहात. पृथ्वीवरील इतर सर्व राष्ट्रांमधून तुम्हीच त्यांचा मौल्यवान ठेवा असावे म्हणूनच याहवेहने तुम्हाला निवडले आहे.
    वचन ४४ मधून
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options