Skip to content
लेवीय १०:१६-२०

लेवीय १०:१६-२०

१६
जेव्हा मोशेने पापार्पणाच्या बोकडाचा शोध घेतला, तेव्हा त्याला समजले की तो जाळून टाकण्यात आला आहे. तेव्हा अहरोनाचे बाकी असलेले पुत्र एलअज़ार व इथामार यांच्यावर तो संतापला.
१७
“तुम्ही पापबली पवित्रस्थानात का खाल्ला नाही? ते परमपवित्र आहे; आणि समुदायाची पापे दूर करण्यासाठी आणि याहवेहसमोर त्यांच्याकरिता प्रायश्चित्त करण्यासाठी याहवेहने ते तुम्हाला दिले आहे.
१८
पाहा, त्याचे रक्त पवित्रस्थानात आणले नव्हते, म्हणून माझ्या आज्ञेप्रमाणे तुम्ही तो पवित्रस्थानात खावयाचा होता.”
१९
तेव्हा अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा त्यांनी आजच त्यांचे पापार्पण व होमार्पण परमेश्वराला अर्पण केले, म्हणून मजवर अशा आपत्ती ओढविल्या. तेव्हा आज मी माझ्या दुःखाच्या दिवसात तो पापबली खाल्ला असता, तर ते याहवेहला आवडले असते काय?”
२०
हे ऐकल्यावर मोशेचे समाधान झाले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options