विलापगीत ३:३७-४२
३७
प्रभूने परवानगी दिल्याशिवाय बोलून तसे घडविण्याचे सामर्थ्य कोणामध्ये आहे?
३८
अनिष्ट व इष्ट ही दोन्हीही परमोच्चाच्या मुखातून येत नाहीत काय?
३९
आमच्या पापांबद्दल आम्हाला शिक्षा होते, तेव्हा आम्ही जिवंत मानवांनी तक्रार का करावी?
४०
आपण स्वतःच्या आचरणांचे निरीक्षण करू व त्यांची परीक्षा घेऊ, आणि परत याहवेहकडे वळू.
४१
आपण स्वर्गातील परमेश्वराकडे आपले अंतःकरण आणि आपले हात उंच करू व म्हणू:
४२
आम्ही पाप केले आणि बंड केले आणि तुम्ही त्याची क्षमा केली नाही.
Settings