विलापगीत ३:२-९
२
त्यांनी मला हाकलून लावले व प्रकाशात नव्हे तर निबिड अंधारात मला चालविले आहे;
३
निश्चितच त्यांनी परत परत, दिवसभर माझ्याविरुद्ध त्यांचा हात उगारला आहे.
४
त्यांनी माझे मांस व माझी त्वचा जीर्ण केली आहेत आणि त्यांनी माझी हाडे मोडली आहेत.
५
विषारी व कठीण परिश्रमाने हाल आणि यातना यांच्या कोंडीत पकडून माझ्याभोवती वेढा दिला आहे.
६
जसे दीर्घकालापूर्वीच मृत झाल्यागत त्यांनी मला अंधकारात राहण्यास सोडले आहे.
७
त्यांनी माझ्याभोवती भिंत बांधली, म्हणजे मी सुटून जाऊ शकणार नाही; त्यांनी मला अवजड साखळदंडानी जखडले आहे.
८
जरी मी एवढा धावा करतो व मदतीसाठी ओरडतो, तरी ते माझ्या प्रार्थना ऐकत नाहीत.
९
मोठमोठे दगड ठेऊन माझ्या मार्गात बाधा घातली आहे. त्यांनी माझी वाट आडवळणांची केली आहे.
Settings