Skip to content
शास्ते ८:१९-२१

शास्ते ८:१९-२१

१९
गिदोनाने म्हटले, “ते माझे भाऊ होते, माझ्याच आईचे पुत्र. जीवित याहवेहची शपथ घेऊन सांगतो की त्यांना तुम्ही ठार केले नसते, तर मी तुमचा वध केला नसता.”
२०
मग आपल्या ज्येष्ठपुत्र येथेर याच्याकडे वळून त्याला म्हणाला, “त्यांना ठार कर!” परंतु येथेर याने आपली तलवार उपसली नाही, कारण तो कोवळा मुलगा होता आणि भयभीत झाला.
२१
जेबह व सलमुन्ना म्हणाले, “तूच ते कर. ‘कारण जसा पुरुष, तसे त्याचे बल.’ ” तेव्हा गिदोन पुढे आला आणि त्यांना ठार केले व त्यांच्या उंटांच्या गळ्यांतील अलंकार काढून घेतले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options