Skip to content
शास्ते ७:१६-२१

शास्ते ७:१६-२१

१६
मग गिदोनाने आपल्या तीनशे सैनिकांच्या तीन तुकड्या केल्या आणि प्रत्येकाला एक रणशिंग व मातीचे एक रिकामे मडके दिले, त्या मडक्यात एकेक मशाल होती.
१७
तो त्यांना म्हणाला, “माझ्याकडे पाहत राहा आणि जसे मी करतो तसे करा. मी छावणीच्या सीमेवरील टोकावर पोहोचल्यावर जसे मी करतो तसेच करा.
१८
मी व माझ्यासोबत असलेल्या सर्वांनी आमची रणशिंगे फुंकल्यानंतर तुम्हीही छावणीच्या सर्व बाजूंना तुमची रणशिंगे फुंका आणि मोठ्याने ओरडून म्हणा, ‘याहवेहसाठी व गिदोनासाठी.’ ”
१९
गिदोन आणि त्याच्या बरोबरची शंभर माणसे मध्य पहाटेच्या सुरुवातीला पहारा बदलल्यानंतर छावणीच्या टोकाला पोहोचले. त्यांनी रणशिंग फुंकले आणि त्यांच्या हातातील मडके फोडले.
२०
तीनही दलांनी रणशिंग फुंकले आणि मडके फोडले. आपल्या डाव्या हातात मशाली धरून आणि उजव्या हातात रणशिंगे धरून जे फुंकणार होते, ते ओरडले, “याहवेहसाठी आणि गिदोनासाठी तलवार!”
२१
प्रत्येक व्यक्ती छावणीच्या सभोवताली आपल्या स्थानी उभे राहिले, सर्व मिद्यानी लोक पळू लागले, ते पळत असता मोठ्याने ओरडत पळाले.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options