शास्ते ४:२०-२१
२०
तो तिला म्हणाला, “डेर्याच्या दाराशी उभी राहा. जर कोणी येईल आणि तुला विचारेल, ‘आत कोणी आहे का?’ तर ‘नाही’ असे सांग.”
२१
सिसेरा थकून झोपलेला होता, परंतु हेबेराची पत्नी याएलने डेर्याची मेख आणि हातोडा घेतला आणि हळूच त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात तिने मेख ठोकली व ती आरपार जाऊन जमिनीत रुतून बसली आणि तो मरण पावला.
Settings