Skip to content
शास्ते २:१-९

शास्ते २:१-९

१
याहवेहचा दूत गिलगालहून वर बोखीम येथे गेला आणि म्हणाला, “मी तुम्हाला इजिप्त देशातून काढून तुमच्या पूर्वजास शपथपूर्वक देऊ केलेल्या देशात आणले. मी म्हणालो, ‘तुमच्याशी केलेला करार मी कधी मोडणार नाही,
२
आणि तुम्ही या देशातील लोकांशी कोणतेही करार करू नका, परंतु तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका.’ तरी तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही. तुम्ही हे का केले?
३
आणि मी हे देखील म्हणालो, ‘मी त्यांना तुमच्यापुढून घालवून देणार नाही; ते तुम्हाला काट्यांसारखे होतील आणि त्यांची दैवते तुम्हाला सापळे होतील.’ ”
४
जेव्हा याहवेहचा दूत या गोष्टी सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, ते लोक मोठ्याने रडू लागले,
५
आणि म्हणून त्या ठिकाणाचे नाव “बोखीम” असे ठेवले. तिथे त्यांनी याहवेहला यज्ञ अर्पण केले.
६
नंतर यहोशुआने इस्राएली लोकांना निरोप दिला, ते देशाचा ताबा घेण्यास गेले, आपापल्या वतनावर गेले.
७
लोकांनी यहोशुआच्या सर्व आयुष्यात आणि त्याच्या मृत्यूनंतरही जे वडीलजन जिवंत राहिले आणि याहवेहने इस्राएलसाठी केलेली महान कृत्ये ज्यांनी पाहिली त्यांनी याहवेहची सेवा केली.
८
नूनाचा पुत्र यहोशुआ, याहवेहचा सेवक, वयाच्या एकशे दहाव्या वर्षी मरण पावला.
९
आणि गाश पर्वताच्या उत्तरेस एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नाथ-हेरेस येथे त्याच्या वतनाच्या प्रदेशात त्यांनी त्याचे दफन केले.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options