Skip to content
शास्ते १९:२२-२६

शास्ते १९:२२-२६

२२
ते आनंदात असताना, गावातील काही अधम लोकांचे टोळके घराभोवती जमा झाले आणि दार जोरजोराने ठोकून त्या म्हातार्‍या मनुष्यास जो घराचा स्वामी होता त्यास ओरडून म्हणू लागले, “जो पुरुष तुझ्या घरी आला आहे त्यास बाहेर काढ म्हणजे आम्ही त्याच्याबरोबर शारीरिक संबंध करू.”
२३
तेव्हा घराचा स्वामी बाहेर गेला आणि त्यांना म्हणाला, “नाही, माझ्या बंधुजनांनो, असले नीच कृत्य करू नका, कारण तो पुरुष माझा पाहुणा आहे, तुम्ही हे घृणास्पद कृत्य करू नका.
२४
पाहा, इथे माझी कुमारी कन्या आणि त्याची उपपत्नी आहे. मी त्या दोघींना तुमच्याकडे बाहेर आणतो आणि त्यांच्याशी तुम्हाला वाटेल ते करा, परंतु त्या पुरुषाशी असले घृणास्पद कृत्य करू नका.”
२५
परंतु ती माणसे त्याचे ऐकेनात. मग त्या पुरुषाने आपल्या उपपत्नीला घेतले आणि तिला त्यांच्याकडे बाहेर पाठविले, आणि त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि रात्रभर तिच्याशी कुकर्म केले व पहाटेस त्यांनी तिला जाऊ दिले.
२६
पहाटेस ती स्त्री आपला स्वामी राहत असलेल्या घरी परतली आणि घराच्या दाराशी खाली पडली आणि उजाडेपर्यंत ती तशीच पडून राहिली.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options