Skip to content
यहोशुआ ९:३-९

यहोशुआ ९:३-९

३
तरीपण जेव्हा गिबोनाच्या लोकांनी ऐकले की यहोशुआने यरीहो आणि आय या शहरांचे काय केले,
४
तेव्हा त्यांनी एका युक्तीचे अवलंबन केले: ते यहोशुआकडे प्रतिनिधी म्हणून गेले, गाढवांवर जुनी गोणपाटे आणि झिजलेले, फाटलेले, ठिगळे लावलेले द्राक्षारसाचे बुधले लादले.
५
त्यांनी अंगात जीर्ण झालेले कपडे व पायात झिजलेले व ठिगळांचे जोडे घातले आणि त्यांच्या शिदोर्‍यांत शिळ्या वाळलेल्या व बुरशी लागलेल्या भाकरी होत्या.
६
ते गिलगाल येथील छावणीत यहोशुआकडे आले. ते यहोशुआला आणि इस्राएली लोकांना म्हणाले, “आम्ही दूरच्या देशातून आलो आहोत; तुम्ही आमच्याबरोबर शांतीचा करार करा.”
७
तेव्हा इस्राएली लोकांनी या हिव्वी लोकांस उत्तर दिले, “परंतु कदाचित तुम्ही आमच्या जवळपास राहत असाल, तेव्हा आम्ही तुमच्याशी शांतीचा करार कसा करू शकतो?”
८
ते यहोशुआला म्हणाले, “आम्ही तुमचे दास आहोत.” परंतु यहोशुआने विचारले, “परंतु तुम्ही आहात तरी कोण आणि कुठून आला आहात?”
९
त्यांनी उत्तर दिले, “तुमचे दास एका अतिशय दूर देशाहून आले आहेत, कारण आम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची किर्ती आणि इजिप्तमध्ये त्यांनी तुमच्यासाठी जे सर्व केले त्याबद्दल ऐकले आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options