यहोशुआ ८:२३-२६
२३
परंतु त्यांनी आय शहराच्या राजाला जिवंत ताब्यात घेतले आणि त्याला यहोशुआकडे आणले.
२४
आय नगरात राहणारे जे मैदानात आणि रानात त्यांचा पाठलाग करीत आले होते त्यांच्यातील प्रत्येकाला इस्राएलने तलवारीने मारून संपविल्यानंतर सर्व इस्राएली लोक आय शहराकडे परत आले आणि तिथे असलेल्या सर्व लोकांना त्यांनी मारून टाकले.
२५
आय शहराचे सर्व रहिवासी; जे पुरुष आणि स्त्रिया त्या दिवशी मारले गेले, त्यांची संख्या बारा हजार होती.
२६
कारण यहोशुआने आपल्या भाल्याचे टोक आय शहरातील सर्व लोकांचा नाश होईपर्यंत, मागे घेतले नाही.
Settings