Skip to content
यहोशुआ ६:९-१६

यहोशुआ ६:९-१६

सशस्त्र शिपाई रणशिंगे वाजविणार्‍या याजकांच्या पुढे चालू लागले आणि मागून येणारे शिपाई कोशाच्या मागे चालत राहिले. या सर्व वेळेपर्यंत रणशिंगे वाजविली जात होती.
१०
परंतु यहोशुआने सैन्याला आज्ञा दिली होती, “युद्धाची घोषणा करू नका, तुम्ही मोठ्याने जयघोष करू नका, तुमचा आवाज उंचावू नका, जयघोष करा असे मी तुम्हाला सांगेन त्या दिवसापर्यंत एकही शब्द बोलू नका.”
११
तेव्हा त्यांनी याहवेहचा कोश घेऊन शहराभोवती एक प्रदक्षिणा घातली. त्यानंतर सैन्य परत छावणीत आले आणि तिथे त्यांनी रात्री मुक्काम केला.
१२
दुसर्‍या दिवशी सकाळीच यहोशुआ उठला आणि याजकांनी याहवेहचा कोश उचलून घेतला.
१३
सात याजक सात रणशिंगे फुंकत याहवेहच्या कोशाच्या पुढे निघाले. सशस्त्र सैनिक त्यांच्या पुढे गेले आणि रणशिंगे फुंकली जात असताना मागे जाणारे सुरक्षा सैनिक याहवेहच्या कोशाच्या मागे गेले.
१४
तेव्हा दुसर्‍या दिवशी त्यांनी शहराभोवती एक वेळेस प्रदक्षिणा घातली आणि ते छावणीकडे परत आले. सहा दिवस त्यांनी असेच केले.
१५
सातव्या दिवशी ते पहाटेच उठले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे त्या शहराला प्रदक्षिणा घातल्या, फक्त त्या दिवशी त्यांनी सात प्रदक्षिणा घातल्या.
१६
सातव्या प्रदक्षिणेच्या वेळी जेव्हा याजकांनी रणशिंगांचा दीर्घ निनाद केला, तेव्हा यहोशुआने सैन्याला आज्ञा केली, “जयघोष करा! कारण याहवेहनी हे शहर तुम्हाला दिले आहे!
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options