यहोशुआ २४:२१-२४
२१
परंतु लोक यहोशुआला म्हणाले, “नाही! आम्ही याहवेहचीच सेवा करणार.”
२२
तेव्हा यहोशुआ लोकांस म्हणाला, “तुम्ही याहवेहची सेवा करण्याचे निवडले आहे, याला तुम्ही स्वतःच साक्षीदार आहात.” त्यांनी उत्तर दिले. “होय, आम्ही साक्षीदार आहोत.”
२३
तेव्हा यहोशुआ म्हणाला, “तर आता तुमच्यामध्ये जे परदेशी दैवते आहेत ती टाकून द्या आणि तुमची अंतःकरणे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराकडे लावा.”
२४
लोकांनी यहोशुआला उत्तर दिले, “आम्ही याहवेह आमचे परमेश्वर यांचीच सेवा करू आणि त्यांच्याच आज्ञा पाळू.”
Settings