यहोशवा इस्राएलच्या नेत्यांना एकत्र बोलावतो
यहोशुआ २३:१-५
१
पुष्कळ काळ होऊन गेला होता आणि याहवेहने इस्राएली लोकास सभोवतालच्या सर्व शत्रूपासून विश्रांती दिली, तोपर्यंत यहोशुआ अतिशय वयस्कर झाला होता,
२
यहोशुआने सर्व इस्राएली लोकास, त्यांच्या वडीलजनास, पुढार्यांना, न्यायाधीशांना आणि अधिकार्यांना बोलाविले; आणि त्यांना म्हटले, “मी फार वृद्ध झालो आहे.
३
याहवेह, तुमचे परमेश्वरांनी तुमच्यासाठी या सर्व राष्ट्रांचे जे काही केले, ते सर्वकाही तुम्ही स्वतःच पाहिले आहे. ते याहवेहच तुमचे परमेश्वर होते जे तुमच्यासाठी लढले.
४
आठवण करा, कशाप्रकारे यार्देनपासून पश्चिमेकडे भूमध्य समुद्रापर्यंत या उर्वरित राष्ट्रांना मी जिंकले व ती तुमच्या गोत्रांना तुमचे वतन म्हणून वाटून दिले.
५
याहवेह तुमचे परमेश्वर स्वतः त्यांना तुमच्यासाठी बाहेर हाकलून देतील. तुमच्यासमोर ते त्यांना बाहेर काढतील आणि याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला अभिवचन दिल्यानुसार तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घ्याल.
Settings