यहोशुआ २१:४-८
४
पहिली चिठ्ठी कोहाथी लोकांच्या कुळांप्रमाणे निघाली. लेवी जे अहरोन याजकाचे वंशज होते त्यांना यहूदाह, शिमओन आणि बिन्यामीन गोत्रांच्या वतनातून तेरा नगरे दिली गेली.
५
बाकीच्या कोहाथी वंशजांना एफ्राईम, दान व मनश्शेहचा अर्धा वंश या गोत्रांच्या प्रदेशातील दहा नगरे चिठ्ठ्या टाकून देण्यात आली.
६
गेर्षोनाच्या वंशजांना इस्साखार, आशेर, नफताली व बाशानातील मनश्शेहच्या अर्धा वंशाच्या गोत्रातील कुळांच्या वतनातून तेरा नगरे देण्यात आली.
७
मरारीच्या वंशजांना त्यांच्या कुळांनुसार रऊबेन, गाद आणि जबुलून गोत्रातून बारा नगरे मिळाली.
८
याहवेहने मोशेद्वारे जसे आज्ञापिले होते, त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी चिठ्ठ्या टाकून लेवी लोकांना नगरे व त्यांची कुरणे नेमून दिली.
Settings