Skip to content
यहोशुआ १२:१-६

यार्देनच्या पूर्वेकडील पराभूत राजे

यहोशुआ १२:१-६
१
यार्देन नदीच्या पूर्वेकडे आर्णोन खोर्‍यापासून हर्मोन पर्वतापर्यंत व पूर्वेकडील सर्व अराबासह ज्या राजांना इस्राएली लोकांनी पराभूत करून ज्यांच्या सीमा हस्तगत केल्या ते हे:
२
हेशबोन येथे राज्य करणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन. त्याच्या राज्याचा विस्तार आर्णोन खोर्‍याच्या कडेवरील अरोएर शहरापासून आणि आर्णोन खोर्‍याच्या मध्यभागापासून अम्मोनी लोकांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत होता. यामध्ये अर्ध्या गिलआदाचा समावेश होता.
३
अराबाच्या पूर्वेकडील भागावर सुद्धा त्याने राज्य केले, तसेच किन्नेरेथ समुद्रापासून अराबाचा समुद्र (म्हणजे मृत समुद्र), बेथ-यशिमोथपर्यंत आणि दक्षिणेकडे पिसगा पर्वताच्या उतरणीपर्यंत राज्य केले.
४
बाशानचा राजा ओग, जो रेफाईम लोकांपैकी शेवटचा होता, त्याने अष्टारोथ व एद्रेई येथे राज्य केले.
५
त्याचे राज्य हर्मोन पर्वत, सलेकाह, संपूर्ण बाशानपासून गशूरी आणि माकाथी लोकांच्या सीमेपर्यंत, अर्ध्या गिलआद पासून हेशबोनचा राजा सीहोन याच्या सीमेपर्यंत विस्तृत होते.
६
याहवेहचा सेवक मोशे व इस्राएलच्या लोकांनी या लोकांवर विजय मिळविला आणि याहवेहचा सेवक मोशेने त्यांचा देश रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांना त्यांचे वतन म्हणून दिला होता.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options