Skip to content
यहोशुआ १०:३१-३५

यहोशुआ १०:३१-३५

३१
मग यहोशुआसह संपूर्ण इस्राएल लिब्नाहहून लाखीशला गेले; ते त्या शहराशी युद्ध करण्यासाठी सज्ज झाले व त्यांच्यावर हल्ला केला.
३२
याहवेहने लाखीश शहर इस्राएलच्या हाती दिले आणि यहोशुआने दुसर्‍या दिवशी त्यांच्यावर ताबा मिळविला. लिब्नाहचा केला तसाच लाखीश शहर व त्यात असलेल्या सर्वांचा त्यांनी तलवारीने नाश केला.
३३
लाखीशवर हल्ला होत असताना, गेजेरचा राजा होराम लाखीश शहरास मदत करण्यास आला. परंतु यहोशुआने त्याचा व त्याच्या सैनिकांचा पराजय केला; त्यांच्यातील एकही जण वाचला नाही.
३४
मग यहोशुआ व त्याच्यासह संपूर्ण इस्राएलने लाखीश सोडल्यावर ते एग्लोनला आले; त्यांनी त्यांच्यावर हल्ल्याची तयारी केली व त्यांच्याशी लढले.
३५
त्यांनी ते शहर त्याच दिवशी हस्तगत केले आणि तेथील प्रत्येकाचा लाखीश येथे केल्याप्रमाणे तलवारीने नाश केला. एकही व्यक्ती जिवंत राहिली नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options