Skip to content
योहान ८:४८-५२

योहान ८:४८-५२

४८
यहूदी पुढार्‍यांनी त्यांना उत्तर दिले, “आम्ही खरे सांगत नव्हतो का की तुम्ही शोमरोनी आहात व तुम्हाला भूत लागलेले आहे?”
४९
येशू म्हणाला, “मला भूत लागलेले नाही, कारण मी माझ्या पित्याचा सन्मान करतो आणि तुम्ही माझा अपमान करता.
५०
मी स्वतःचे गौरव करू इच्छित नाही; पण एकजण ते इच्छितो आणि तो न्यायाधीश आहे.
५१
मी तुम्हाला निश्चित सांगतो, जे कोणी माझे वचन पाळतात त्यांना मरणाचा अनुभव कधीही येणार नाही.”
५२
यावर त्यांनी उद्गार काढले, “आता आमची खात्री झाली की, तुला भूत लागले आहे! प्रत्यक्ष अब्राहाम व संदेष्टेही मरण पावले आणि तरी तू म्हणतो की तुझी वचने पाळणार्‍यांना मृत्यूचा अनुभव कधीही येणार नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options